Shree Saptashrung Devi Niwasini Trust
 
 
Help Desk
  • Geographical Information
  • Way to Garh
  • Garh on Google
  • Important Places on Garh
  • Pooja Vidhi
  • donation
Online Darshan
Online Pooja
 
Mahatmya
मनोरथपूर्ती  करणारी  देवी
देवीला  महालक्ष्मी  म्हणतात, जो कोणी या सर्वश्रेष्ठ महालक्ष्मीचे  पूजन करील  त्याचे  मनोरथ पूर्ण होतील. या सप्तशृंग पर्वताजवळ मार्कंण्डेय ॠषींनी आराधना केली असे ब्रम्हदेव म्हणतात. या सप्तशृंग पर्वताभोवती तीन कोसांपर्यंत जी भूमी आहे ती सर्व कामधेनूसारखी आहे. या भूमीवर राहून देवीचे भजन पूजन  करणार्‍यांचे  मनोरथ देखील कामधेनूप्रमाणे पूर्ण होतील. पर्वतावर महालक्ष्मीचे स्थान आहे. म्हणुन या पर्वतावर जे जे वृक्ष आहेत ते सर्व पाषाण व गौरकादिक धातू सुवर्णमय आहेत. या पर्वताजवळ आसलेल्या नद्या या देवस्वरूप  आहेत. सात शिखरांवर नवदुर्गेची स्थापणा असून ती गुप्त आहेत. पर्वताच्या जवळील सरोवरात एक शुभ्रवर्णाचा ञिनेञी मासा आहे. पठारावर  देवीच्या डाव्या बाजूस  देवनळी नावाने ओळखला जाणारा भाग असून तेथे पाण्याची संतत धार वाहत असते. Devi
सिध्दिदायी अष्टादश देवी
श्री जगदंबेने या पृथ्वीवर अनेक ठिकाणी आपली स्थाने केली आहेत. त्या सर्व स्थानांमध्ये सप्तशृंग स्थान अतिश्रेष्ठ असून सर्व प्रकारची सिध्दी देणारे क्षेञ आहे. कोठे अष्ठभुजा कोठे चतुर्भुजा देवीचे स्थाने आहेत. परंतु या सप्तशृंग पर्वतावर राहून अठरा हाताने युक्त अशी श्रेष्ठ सदैव संपत्ती व सर्व सिध्दी देणारी हीच अष्टदशभुजा देवी महालक्ष्मी होय. या सप्तशृंग गडावर राहून अष्टमी, नवमी, चतुर्दशी, मंगळवार या तिथीस व वारास जो भगवतीचे पूजन करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. Devi
दयायुक्त  भगवती  महालक्ष्मी
देवीचा अष्टाक्षर महामंञाचा जप या पर्वतावर राहून करणार्‍यास, त्याचे इच्छित साध्य होण्याची संधी  मिळेल. महिषासुरमर्दिनीची ध्यानयुक्त पुजा करणार्‍यास ज्ञानप्राप्ती होईल. इंद्रायणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा चामुंडा, नारसिही या सात देवता अत्यंत क्रूर असून नानाविध शस्ञांनी युक्त आहेत. दैत्यसंहारासाठी  सज्ज असलेल्या त्या सप्तशृंग देवता त्या सात शिखरांवर  वास्तव्य करतात. या पर्वताच्या खालील भागात सदैव महालक्ष्मीची सेवा करण्यात तत्पर असलेले वेताळ पर्वत रक्षणासाठी आहेत.  ब्रम्हदेव वरील विवेचनानंतर शेवटी म्हणतात,'हे नारदा,
महिषासुराचा नाश करणारी ही सिंहावर स्थित व अलंकारभूषित असलेली, दयेनेयुक्त भगवती महालक्ष्मी आहे. तिचे पूजन करणार्‍याचे मनोरथ पूर्ण होऊन त्यास मुक्ती मिळेल.'
Devi
सर्व शस्ञांशी देवी सज्ज
शंकरांनी ञिशूळ, विष्णूने चक्र, वरूणाने शंख, अग्नीने दाहकत्व, वायुने धनुष्यबाण, इंद्राने वज्र व घंटा, यमाने दंड, वरूणाने पाश, दक्षप्रजापतीने स्फटिकक्षमाला, ब्रम्हदेवाने कमंडलू, सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपी देवाने खड्ग (तलवार) व ढाल, क्षीरसागराने उज्वल हार व वस्ञ, तसेच कुंडले, कंगण आदि दागिणे दिलेत. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परशु व चिलखत, समुद्राने कमल हार, हिमालयाने सिंहवाहन व रस्ते, कुबेराने मध्यपान आणि शेषाने देऊन या देवतांनी देवीचा सन्मान केला. या नंतर युध्दाला उत्सुक झालेल्या देवीने दहा दिशांना भेदून टाकणारी गगन भेदी गर्जना केली. त्यामुळे दिशा व प्राणि प्रक्षुब्ध झाले. पर्वत डळमळू लागले. आता युध्द करून देवी दैत्य संहार करणार या कल्पनेने सर्व देवांनी 'देवीचा विजय असो'. असा जयजयकार केला, तर भितीने नम्र होउन ॠषींनी तिची स्तुती केली. तिकडे देवीच्या गर्जनेंने घाबरलेल्या राक्षसांनी महिषासुराच्या आधिपत्याखली देवीशी युध्दाला सुरूवात केली. Devi